Scholarship या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती; थेट अर्ज करा

Scholarship सन २०२२-२३ या वर्षात देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी – मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेमार्फ़त डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती या योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत Scholarship.

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३१.१२.२०२२

कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख : ०६.०१.२०२२

ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी खालील प्रमाणे नमूद महत्वाच्या बाबी निर्देशनास आणून देण्यात येत असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दक्षता घ्यावी व पात्रता असल्यास अर्ज करावा.

या योजने अंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा – कुणबी व कुणबी- मराठा या जातीतील असावा.

महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.

५० हजार रुपये स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी ; येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या / केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.

तसेच पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविकाअभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तर पदवी / पदवीत्तोर पदविकासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या/ केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.

या शिष्यवृत्तीसाठी विहीत केलेल्या विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पुर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.

उपरोक्त ३०० पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थीपैकी ५०% जागा मुली / विद्यार्थीनी करिता राखीव असतील.

या योजनेअंतर्गंत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकुण वार्षिक उत्पन्न हे नॉन क्रिमी लेयर मधील असणे ₹८.०० आवश्यक आहे. एकुण दरवर्षी ३०० विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्ती करिता करण्यात येईल. पालक / विद्यार्थी यांचे एक रक्कमी वार्षीक उत्पन्नानुसार शिष्यवृत्ती देय विद्यार्थी संख्या बाबतची माहीती खालील रकाना मध्ये दर्शविण्यात आली आहे Scholarship.

५० हजार रुपये स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी ; येथे क्लिक करा

Leave a Comment